भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ९ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा B.E/B.Tech/B.sc मध्ये पदवी प्राप्त केलेले असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी दोन वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३४ वर्ष असायला हवी.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ८४,००० रुपये पगार मिळणार आहे

Scroll to Top