समाज कल्याण आयुक्त पुणे येथे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी स्टेनोग्राफर, स्टेनोग्राफर टायपिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पदासाठी इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत MS CIT प्रमाणपत्र आणि कॉम्प्युटर विषयात कोर्स केलेला असावी.
समाज कल्याण निरीक पदासाठी पदवी आणि MS CIT चा कोर्स केलेला असावा. लघुलेखक म्हणजेच स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराने टायपिंगचा कोर्स केलेला असावा. नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.sjsa.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० ते १,४२,४०० रुपये पगार मिळणार आहे.