एनसीईआरटीमधील या भरती मोहिमेत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ncert.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पीएचडी पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे.

NCERT मधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार सूट देण्यात आली आहे. एनसीआरटीमधील या नोकरीसाठी ५८००० रुपये पगार मिळणार आहे. तसेच ट्रॅव्हल खर्च आणि इतर खर्च दिला जाईल.

NCERT मधील ही भरती रिसर्च असोसिएट पदासाठी करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिक्षेशिवाय तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.