CEL Recruitment 2024: भारतात सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या तरुणांसाठी आणखी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारासाठी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये १९ पदांसाठी भरती आहे.
उमेदवार CEL च्या अधिकृत वेबसाइट https://www.celindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत.भारत सरकारच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. येथे पदवीधर अथवा डिप्लोमाधारक उमेदवार अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर याचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.
CEL Recruitment 2024 रिक्त जागा तपशील:
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक: १२ पदे
तंत्रज्ञ ‘बी’: ७ पदे
एकूण पदांची संख्या: १९
शैक्षणिक पात्रता:
CEL Recruitment 2024 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षांचा डिप्लोमा/B.Sc पदवी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग)
CEL Recruitment 2024 तंत्रज्ञ बी:
आयटीआय प्रमाणपत्रासह एसएससी किंवा समकक्ष पात्रता.
CEL Recruitment 2024 वयोमर्यादा:
जास्तीत जास्त २५ वर्षे, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ वर्षांहून अधिक नसावे. वयाची गणना ३१ ऑक्टोबर २०२४ नुसार होईल. कमाल वयोमर्यादेत आरक्षित वर्गाला सवलत देण्यात आली आहे.
CEL Recruitment 2024 पगार:
ज्युनिअर टेक्नकल असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २२ हजार २५० ते ७५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. तर टेक्निशियन बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १९ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
CEL Recruitment 2024 निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा
ट्रेड टेस्ट
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय चाचणी
CEL Recruitment 2024 शुल्क:
SC, ST, PWBD, माजी सैनिक: मोफत
इतर सर्व श्रेणी: रु १०००
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती; इच्छुक उमेदवारांनी लगेच करा अर्ज; अर्जाची लिंक बातमीत
CEL Recruitment 2024 याप्रमाणे अर्ज करा:
१.अधिकृत वेबसाइट https://www.celindia.co.in वर जा.
२.करिअर विभागातील करंट जॉब ओपनिंग्जवर क्लिक करा.
३.आवश्यक तपशील टाकून फॉर्म भरा.
४.आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
५.फॉर्म सबमिट करा.
६.त्याची प्रिंट आऊट घेऊन ठेवा.