बँकेत ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे.इंडियन बँकेतील या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
इंडियन बँकेची ही भरती सुरु झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती indianbank.in या वेबसाइटवर दिली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२४ आहे.
पात्रता
इंडियन बँकेतील डॉक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त अॅलोपॅथिक मेडिकल सिस्टीममधून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्यांच्याकडे १० वर्षे कामाचा अनुभव असायला हवा.
इंडियन बँकेतील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शॉर्टलिंस्टिग केली जाणार आहे. तसेच उमेदवारांच्या परफॉर्मंसच्याआधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला २०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्हाला इंडियन बँक, झासी अंचल, ९२, सिविल लाइन्स, झाशी येथे पाठवायचा आहे.