CRPF Recruitment latest news: केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. सीआरपीएफ अंतर्गत रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सीआरपीएफच्या crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपला अर्ज दाखल करु शकता.

सीआरपीएफमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही 6 जानेवारी 2025 पूर्वी आपला अर्ज दाखल करु शकता. एनडीआरएफच्या 5व्या आणि 10व्या बटालियनसाठी ही भरती प्रक्रिया केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 70 वर्षे असावी. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जात आहे. म्हणजेच तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये.

हे पण वाचा : नॅशनल हायवे अथॉरिटीमध्ये थेट भरती; परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी, महिन्याचा पगार 2 लाख रुपये

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुधन या विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे.

पगार किती मिळणार?

या पदांवर निवड झाल्यास संबंधित उमेदवाराला दर महिना पगार म्हणून 75000 रुपये दिले जातील. यासोबतच भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, ग्रॅच्युएटी, वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठता लाभ, पदोन्नतीच्या संधी आहेत.

हे पण वाचा : ठाणे मनपात नोकरीची संधी; वेतन 17000 ते 60000 रुपये, आजच करा अर्ज

तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर अर्ज करण्यापूर्वी भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या. भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी https://rect.crpf.gov.in या लिंकवर क्लिक करा. संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून मगच आपला अर्ज दाखल करा.

निवड प्रक्रिया कशी होणार?

या भरती प्रक्रियेत थेट मुलाखतीच्या आधारे निवड केली जाणार आहे. मुलाखतीनंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे.

मुलाखतीची तारीख आणि वेळ

6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता – कम्पोझिट हॉस्पिटल, CRPF, जीसी कॅम्पस, तळेगाव, पुणे, महाराष्ट्र
6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता – कम्पोझिट हॉस्पिटल, CRPF, हैदराबाद, तेलंगणा