बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत सध्या भरती निघाली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आयटी मॅनेजर स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. (Government job)

 

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Indian Post Payments Bank Recruitment)

 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती आयटी विभागात होणार आहे.एकूण ६१ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. असिस्टंट मॅनेजर आयटी पदासाठी ५४ जागा रिक्त आहे. तसेच विविध विभागात मॅनेजर पदासाठी १-१ जागा रिक्त आहेत. सायबर सिक्युरिटी एक्सपोर्ट पदासाठी ७ जागा रिक्त आहे.या नोकरीसाठी भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. (IPPB Recruitment)

 

या नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा १८ वर्षे असावी.या नोकरीबाबत अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षेद्वारे होणार आहे.

 

स्टेट बँकेत भरती

 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. १३७०० पदांसाठी ही भरत करण्यात येणार आहे. क्लर्क पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आबे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. स्टेट बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला IBPS च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.