बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बिझनेस कॉरेस्पॉडंट पदासाठी ही भरती करण्यात येत आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (Central Bank of India)

 

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०२५ आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. २१ ते ४५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.(Central Bank of India Recruitment)

 

 

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पदवी असणे गरजेचे आहे. त्याचसोबत कॉमप्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी एमएससी/बीई / एमसीए / एमबीए पदवी प्राप्त उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. (Bank Job)

 

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १२००० ते १५०० रुपये बेसिक सॅलरी दिली जाईल. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे क्षेत्रिय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, सीएसआय बिल्डिंग, पुलिमूडू, एमजी रोड, त्रिवेंद्रम, केरळ येथे अर्ज पाठवायचा आहे

 

ESIC भरती

 

सध्या कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.कर्मचारी राज्य विमा निगममध्ये ऑफिसर पदांसाठी भरती सुरु आहे. विमा ग्रेड ऑफिसर २ पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी ३१ जानेवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.